सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प आहेत. शिराळा तालुक्याला वरदान लाभलेला चांदोली धरण व परिसर या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनाच्या दृष्टीने व जंगल सपारीच्या दृष्टीने येत असतात. या परिसराचा विकास व्हावा. अशी मागणी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची अनेक वर्षापासून आहे.
आज या निसर्ग रम्य भागाची पहाटे अनुभवावी यासाठी सकाळी पहाटे 5.30 वाजलेपासून दुपारी 1 पर्यत सलग सात तास हुन अधिक काळ या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष अभयारण्यात जाऊन पहाणी केली. असणाऱ्या अनेक गोष्टी जाणून घेत. वेगवेगळ्या वनस्पती,पक्षी यांची यांची माहिती घेतली.या दौऱ्यामध्ये निसर्गाने आपला किती वर्धान दिले आहे यांची प्रचिती आली. या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव व चांदोली अभयारण्य यांचा संपूर्ण अभ्यास केलेले. रमन कुलकर्णी व फारूक मेहता यांनी अभ्यास पूर्ण माहिती दिली. पर्यटक वाढीसाठी अपेक्षित असणाऱ्या मुद्दावर चर्चा केली. पर्यटक वाढला तर निश्चित पणे या विभागाचा आर्थिकस्तर वाढण्यास मदत होणार आहे.या पाहणी दौऱ्यामध्ये घेतलेले अनुभव निश्चित कायम स्मरणात राहतील.
या प्रकल्पाचा विकास साधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून पर्यटक वाढीस चालना देणार आहे.
यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उपसंचालक स्नेहलता ताई पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील आदीसह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वारणावती येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव निसर्ग माहिती केंद्र, चांदोली चे उद्घाटन केले. या केंद्रामध्ये प्रचितगड, उदगिरी मंदिर व जंगल परिसरातील कुंभार्ली घाट, वसंत सागर पाणलोट क्षेत्र व परिसर, चांदोली राष्ट्रीय उद्यान, पाली निसर्ग मनोरा, राम मंदिर परिसर, चांदेल पठारावरून दिसणारे कोकण दर्शन, भैरवगड, सह्याद्री व्याघ्र राखीव व चांदोली राष्ट्रीय उद्यान अशी एकत्रित माहिती दाखवण्यात आली आहे. पर्यटकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. यावेळी चांदोली सह्याद्री व्याघ्र राखीव कराड च्या उपसंचालक स्नेहलता पाटील, सहाय्यक वनरक्षक ढेबेवाडी संदेश पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील, आदींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments