जाणीव ग्रुपचा उपक्रम : शिराळा, शाहूवाडी तालुक्यात जपली वाचनसंस्कृती
बाजीराव घोडे-पाटील
कोकरूड, वाचनाचा लळा, फुलवी जीवनाचा मळा ज्ञानग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्वाचे कौशल्य आहे. बदलत्या परिस्थितीत व माहिती-तंज्ञान युगात वाचनसंस्कृती विसरून चालणार नाही.
वाचनाने व्यक्तिमत्व बहुआयामी बनते. शिराळा तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या 'जाणीव ग्रुप'च्या चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव, मुख्याध्यापक बी. ए. कांबळे, सहदेव खोत, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी तानाजीदळवी, मारुती जाधव, संदीप शिंदे, बाबाजी जाधव, प्रतापराव शिंदे, अर्जुन सावंत, अविनाश जाधव,
शिवाजी जाधव, नथुराम सावंत या मित्रांनी चिंचोली, मोरेवाडी, कुसाईवाडी, दुरंदेवाडी, खुजगाव, शिराने खुर्द, खवरेवाडी, माळेवाडी अस्वतवाडी, मांगरूळ व शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी, विरळे येथील
प्राथमिक शाळांमधून 'पुस्तक पेडी उपक्रम राबवत वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत अशा अनोख्या पद्धतीने केले.
ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविती माणुसकी
जिथे वाचन होते. तिथे विचार होतात. हेच विचार आपल्याला ध्येय ठरवायला गाठायला मदतही करतात.
पुस्तकातून ज्ञान, ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते. वाचनामुळे भावविश्व, अनुभवविश्व विस्तारते. जगातले सर्व अनुभव आपण घेऊ शकतो. एकाच जीवनात अनेक आयुष्य जगू शकतो. - अशोक जाधव, काष्ठशिल्पकार, चिंचोली
अन् ग्रंथ शिकविती शांती या काव्य पंक्तीतून कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ग्रंथ व वाचनाचे महत्त्व याचे सुरेख वर्णन केले आहे. जाणीव ग्रुपच्या उपक्रमामुळे साध्य होईल.
0 Comments