कोकरूड येथे दसरा महोत्सवास प्रारंभ
कोकरूड :- कलाविष्कार कल्चरल फाऊंडेशन कोकरूड (ता. शिराळा) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (ता. ७) घटस्थापनेदिवशी या महोत्सवास प्रारंभ झाला.
या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून मागील वर्षी कोरोनामुळे यांच्यामध्ये खंड पडला होता. ग्रामदैवत निनाईदेवीच्या नावाने जागर निनाईचा हा घटस्थापनेपासून सलग सात दिवस सायंकाळी ७ ते १० या वेळेत निनाई मंदिर परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमाने साजरा होत आहे. गुरुवारी या कार्यक्रमातील प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ग्रुप शिराळा, यांच्या "स्वरगंध" या भावगीत-भक्तिगीतांने दसरा महोत्सवास सुरवात झाली. "स्वरगंध" चे कलाकार मिलिंद जोशी, शीतल पोतदार, सहेली मुलाणी, संध्या पोतदार, मयूर जोशी, प्रशिक कांबळे सुमधुर गीते सादर केली. स्वागत, प्रास्ताविक संतोष सोनवले यांनी केले. आभार व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी मानले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजित देशमुख, उपसरपंच पोपट पाटील, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, विकास नांगरे, कुंभी साखरचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, सुहास पाटील उपस्थित होते.
0 Comments