मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
योजनेच्या प्रमुख अटी व
नियमः
इ१ ते ५ वी परिरक्षण भत्ता
१०००/-
इ६वी ते १० वी प्रवेश
शुल्क ५०० + शिक्षण शुल्क ३५०० + परिरक्षण भत्ता १००० एकूण ५०००/- (वसतिगृहाबाहेर
राहणारे विद्यार्थी)
इ.६वी ते १० वी: प्रवेश शुल्क ५०० + शिक्षण शुल्क ३५०० + परिरक्षण भत्ता ६००० एकूण १००००/- (वसतिगृहात राहणारे विद्यार्थी)
अर्ज करण्याची पद्धत :
Nation Scholarship Portal
(www.sholarships.gov.in) वर online
अधिक माहितीसाठी कुठे
संपर्क करावा :
जिल्हास्तर : शिक्षणाधिकारी
(माध्यमिक), जिल्हा परिषद,
राज्यस्तर: अल्पसंख्याक व
प्रौढ शिक्षण संचालनालय
इ१ ली ते १० वी या
वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हि योजना असून
अल्पसंख्याक समाजातील
आर्थिकदृष्ट्या मागास गुणवत्ताधारक विध्यार्थ्यांना १ ली ते १० वी
पर्यंत शिक्षणासाठी
प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती थांबावी यासाठी,
तसेच अल्पसंख्याक पालकांना
त्यांच्या पाल्यास शाळेत पाठवण्यास उत्तेजन देण्यासाठी
ही योजना आहे.
योजनेच्या
प्रमुख अटी व नियमः
विद्यार्थी अल्पसंख्याक
समाजाचा असावा.
मागीलवर्षी ५०% पेक्षा
जास्त गुण असावेत.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
योजनेसाठी आवश्यक
कागदपत्रे :
१.जन्माचा दाखला
२. विद्यार्थाचा फोटो
३. मागील वर्षाची मार्कशीट
४. कायम निवासी पत्त्याचा
पुरावा
५. उत्पन्नाचे
स्वयंघोषणापत्र
६. अल्पसंख्याक समाजाचा
असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र


0 Comments