आम
आदमी विमा योजना
"आम आदमी विमा योजना" नेमकी काय आहे?
लाभार्थी:
ग्रामीण
भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी
बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण
करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो.
वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका
असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.
या योजनेचे फायदे:
या
योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास
रक्कम देण्यात येते.
- नैसर्गिक मृत्यू - रु.30,000/-
- अपघाती मृत्यू - रु.75,000/-
- अपघातामुळे कायमचे अपंग - रु.75,000/-
- अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास - रु.75,000/-
- अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास - रु.37,500/-
- या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या
दोन
मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती
देण्यात येते.


0 Comments