कोकरूड पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

 कोकरूड पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई|

कोकरूड येथे कोरोना चा प्रादुर्भाव रोकन्या साठी संचार बंदीचे कडेकोट अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे,



कोकरूड गावा मध्ये विनाकारण फिरणार व मास्क न लावणाऱ्या वर कारवाई कारण्यात येत आहे. तसेच भागात संचार बंदीचे पालन न करता दुकान चालु ठेवणाऱ्या वरती दांडात्मक कारवाई कारण्यात येत आहे.


कोकरुड फाटा येथे नाकाबंदी; सात वाहनचालकांवर कारवाई कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) पोलीस स्टेशनने परिसरात संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे.


कोकरूड फाटा


कोकरुड (ता. शिराळा) पोलीस स्टेशनने परिसरात संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे. कोकरूड फाटा या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या एकूण सात वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. विनामास्क फिरणाऱ्या एकूण सतराजणांवर कारवाई करण्यात आली आहे.



जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून दुकाने चालू ठेवल्याबद्दल आरळा येथील दोन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढे देखील संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments