चांदोली धरण (ता. शिराळा) येथे वारणा नदीत आज दुपारी चारच्या सुमारास मित्रांसह पोहण्यासाठी गेलेला तरुण पोहताना अचानक पाण्यात बुडाला. तो प्रवाहात वाहून गेला. सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. अंधार पडल्याने उद्या (सोमवारी) सकाळी शोध घेण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत कोकरूड पोलिसांत नोंद झाली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की अभिषेक समुवेल काळे (कोडोली, ता. पन्हाळा) हा तौहिद तांबोळी, अमोल भोसले, प्रकाश चोपडे, ईर्शाद जमादार, अक्षय चरणकर, संदेश अवळे, दशरथ सुतार, सुजित चोपडे (सर्व कोडोली) यांच्यासह चारचाकीतून (एमएच १०, बी एम १३२४) चांदोली धरण येथे जेवणास गेले होते. धरणाच्या पायथ्याशी उखळू (ता. शाहूवाडी) या बाजूस वारणा नदीकाठी सर्व मित्रांनी मिळून जेवण केले. जेवणापूर्वी अभिषेक अंघोळीसाठी पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक वाहत जाऊन बुडाला व दिसेनासा झाला. मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी धाव घेत शोधाशोध केली. परंतु तो आढळला नाही.
आज दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.
उशिरापर्यंत ●● स्थानिकांच्या मदतीने
शोधमोहीम सुरू होती. अंधार पडल्याने शोध थांबवण्यात आला. उद्या सकाळी सांगली येथील रेस्क्यू पथकाला बोलावले आहे. शोधमोहीम सुरू करणार आहे
0 Comments